
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर दर्शनी भागात भले मोठे एक लोखंडी गेट उभे आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारे मजबूत व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असे हे गेट उभारले आहे. परंतु त्या गेटवर वरच्या बाजूला “परभणी रेल्वे स्थानक आपले सहर्ष स्वागत करीत आहे” असा मजकूर लिहिलेला एक बोर्ड लावला तर प्रवासी नागरिकांनाही त्याचा आनंद वाटेल. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडे सुध्दा प्रवासी नागरिकांचा आदर करण्याची मानवता असल्याचे यावरुन दिसून येईल.
प्रशासन व प्रबंधकांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेतल्यास उपकृत ठरु शकेल शिवाय सांस्कृतिक सौंदर्यामध्ये अधिकच भर पडू शकेल यात शंकाच नाही.