
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
मागील वीस वर्षापासून होत होती पुलाची मागणी
अनेक आमदार व खासदारांनी फोडले नारळ मात्र प्रत्यक्षात पुलाचा पत्ताच नाही.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नांदा गावाच्या शेजारून माणिकगड पहाड व अमलनाला प्रकल्प येथून उगम पावणाऱ्या नाल्यावरून आज सकाळी दहा ते अकराच्या सुमारास नांदा गावातील काही शेतकरी आपल्या शेतात खत देण्याकरिता गावातीलच सहा मजूर महिलांना बैलबंडी मध्ये बसवून नाला ओलांडत असताना पाण्याचा अंत न लागल्याने बैल बंडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागली सदर प्रकार घडत असल्याचे व आरडाओरडा ऐकून गावातील लोकांनी नाल्या कडे धाव घेतली व कसेबसे बैलबंडी तील महिला व दोन पुरुष यांचे प्राण वाचवले मात्र यदाकदाचित यामध्ये अपयश आले असते तर कोणाला जबाबदार धरलं असतं मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह अजूनही कमी झालेला नाही मात्र शेतातील उभे पीक अतिवृष्टीमुळे करापायला लागल्याने शेतकरी बांधवा समोर फार मोठे संकट उभे राहिल्याने जीव मुठीत घेऊन तो अशा प्रकारचे धाडस करताना चे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे सदर नाल्यावर बंधारा वजा पूल निर्मिती व्हावी याकरिता माजी आमदार खासदार विद्यमान आमदार यांच्याकडे शेकडो वेळा मागण्या करण्यात आल्या निवेदन देण्यात आली मात्र कोणीही याकडे ढुंकूनही पाहिले नाही अनेक पदाधिकाऱ्यांनी तर चक्क घटनास्थळी जाऊन मोजमाप करून नारळ सुद्धा फोडली मात्र पुलाची निर्मिती झाली नाही व दैव करो या उक्तीप्रमाणे आज नागरिकांच्या सतर्कतेने आठ प्राण वाचले असे झाले नसते तर आज संपूर्ण गावावरती शोककळा पसरली असती व याला जबाबदार कोण असतं असा प्रश्न आता नागरिकांना पुढे उभा राहिला असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित या नाल्यावर पूलाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरायला लागलेली आहे.