
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर
पन्हाळा गडावरील पडझड झालेल्या बुरुज, तटबंदी, ऐतिहासिक वास्तु यांचे संवर्धन लवकरात लवकर व्हावे म्हणुन तहसीलदार,नगरपरिषद, पुरातत्व विभाग यांना निवेदन दिले
निवेदनात ते म्हणाले की, पन्हाळा गडावरील बुरुज आणी तटबंदी जिर्ण झाली असुन पावसाच्या माऱ्याने वेगाने ढासळत आहेत त्याचे वेळोवेळी जतन व संवर्धन पुरातत्व विभाग करत नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी हे प्राथमिक स्वरुपात निवेदन देत आहे. पन्हाळा गडावर पर्यटक मद्यपान करण्यासाठी येतात त्याला आटकावा होणे गरजेचे असुन पन्हाळ्यावरील मद्य विक्रीचे दुकान बंद करावे तसेच गडाचे पावित्र्य राखुन गडावरील बेकायदेशीर बांधकामे काढावीत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कोल्हापुर जिल्हा प्रमुख सुरेश यादव, बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख सुरेश रोकडे, शिवाकार्य निष्ठा चे प्रमुख शिवाजी खोत यांचे सह सुमारे शंभर जणांनी मोर्चा काढुन हे निवेदन दिले.