
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
खामगांव: दि. १८. दिक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभेची आहे. त्याबाबतचे सर्व दस्ताऐवज भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी आपणास उपलब्ध करून दिले आहेत .जी कागदपत्रे आजपर्यंत संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध नव्हती. धम्म चक्र प्रवर्तन दिनाला धम्मपीठावर वाढणारी राजकारणी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी ६६ वा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा येणाऱ्या दि.५ ऑक्टोबरला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिक्षाभूमीवर साजरा करण्यात येईल असा दृढ विश्वास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बुलडाणा (उत्तर )च्या वतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक सभागृहात दि.१७ जुलैला धम्म मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलतांना केले .केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या देशातील विरोधी पक्षांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे स्वायंतता दिलेल्या केंद्रीय संस्था सीबीआय, न्यायसंस्था,एनआयए ,इडी या संस्थाचा केंद्र सरकार विरोधी पक्षाविरूद्ध दुरूपयोग करीत आहे.तर भारताची अशोक स्तंभावरील चारसिंहाची शांत,संयमी असलेल्या राजमुद्रेचे विकृतीकरण करून रागीट व क्रुर बनविली आहे . आपल्या देशाचा राष्ट्रध्वज खादी किंवा सुती कापडाचा आहे. तो राष्ट्रध्वज प्लास्टिकवर छापण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे.आज देशातील केंद्रीय संस्था बाबत जे सुरू आहे तसेच राष्ट्रीय प्रतिकांचे विदृपीकरण थांबविण्यासाठ आपणास लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.धम्माचे काम करणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दलासारख्या इतर संस्थांना सोबत घेऊन हे आंदोलन करावे लागेल. म्हणजे संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या विरुद्ध आम्ही लढलो परंतु शरणागती पत्करली नाही हा संदेश पुढील पिढीला सांगता येईल.राज्यात किंवा केंद्रात आपली राजकीय सत्ता नाही. परंतु कोविड १९ मुळे स्थगित असलेली जनगणना पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू होईल. सन २०११ च्या जनगणेत चुकीची आकडेवारी दाखविण्यात आली आहे. आपणास योग्य माहिती भरून आपली खरी लोकसंख्या समजेल. त्याकरिता आपण धर्माच्या रकाण्यात बौद्ध व जातीच्या रकण्यात आपली धर्मांतरापूर्वीची महार,मांग ,चांभार किंवा जी असेल ती जात लिहावी लागेल. म्हणजे अंदाज पत्रकात मंजूर होणारा बारा हजार कोटी रुपयांचा विकास कमी होणार असेही ते पुढे म्हणाले.धम्म मेळाव्याला सुरवात होण्यापूर्वी नगरपरिषदेच्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय चेअरमन डाॅ. हरीष रावलीया, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना समता सैनिक दलाचे वतीने मेजर जनरल के. एम. हेलोडे यांनी मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ढोल ताश्यच्या निनादत भव्य मिरवणूक काढण्यात आली.धम्म मेळाव्याचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध , डाॅ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या फोटोला माल्यर्पणाने झाली. ह्यावेळी डाॅ. हरीष रावलीया, चंद्रबोधी पाटील, भीमराव आंबेडकर, जगदीश गवई, भिकाजी कांबळे,सुशिल वाघमारे, यांनी ह्या धम्म मेळाव्याला संबोधीत केले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष एस एस वले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आनंद वानखडे यांनी तर संचलन जिल्हा सरचिटणीस बी.के.हिवराळे यांनी केले.कार्यक्रमाला राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपालि इंगळे, के. के.शेगोकार, छायाताई बांगर, आर.आर.जवरे, दादाराव हेलोडे, जि.यु.गवई, विनेश इंगळे,दगडु सरदार, इश्र्वर दाभाडे, दिलीप मेढे, भाऊराव गव्हांदे, निवृत्ती वानखडे, जगदीश हातेकर राजेश शेगोकार यांनी परीश्रम घेतले.