
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
सोमवारी पुण्यतिथी तर एक ऑगस्टला लोकशाहीरांची जयंती आहे..
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील देवगाव रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडला आहे मात्र याकडे प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे सोमवारी लोकशाहीरांची पुण्यतिथी होती त्यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणावर अभिवादन करण्यासाठी येत होते मात्र स्मारक परिसरात बोर,धोत्रा,काँग्रेस, व इतर गवताने स्मारक परिसर काटेरी झूडपांच्या विळख्यात सापडले आहे
एक आगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे किमान जयंतीपर्यंत किमान स्मारकांचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे याठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे, हायमास्ट दिवे, पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी समाज बांधवांकडून होते आहे सोमवारी पुण्यतिथी असल्याने अनेक समाजबांधवानी याठिकाणी अभिवादन केले यावेळी भाजपयुमोचे जिल्हापाद्यक्ष अमोल जाधव, भाजपचे संजय पांडव,बाजार समितीचे संचालक सुनिल पाखरे, वाल्मिक वाकळे,अक्षय चव्हाण हे अभिवादन करण्यासाठी आले असता स्मारकची दुर्दशा पाहून त्यांनी स्वतः फावडे घेऊन पुतळा परिसरातील काटेरी झूडपे काढली व नंतर लोकशाहीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.