
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर
येथील महात्मा पब्लिक स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने सोमवारी शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी परंपरेच्या वेगवेगळ्या वेशभूषा मध्ये आले होते. जणू काही शाळा म्हणजे प्रति पंढरपूर वाटत होते. छोटे छोटे बालगोपाल वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये आकर्षक वाटत होते. पालकांनी सुद्धा कार्यक्रमासाठी श्रम घेतले. तसेच पालकांचा स्फुर्त सहभाग पण होता. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर पाऊल खेळले. त्यावेळी शाळेच्या संचालिका सौ. संगीता नेत्रगावे-पाटील, मुख्याध्यापिका सौ.स्मिता तिवारी, तसेच सहशिक्षिका मोनिका सुने, अश्विनी ममदापूरे, शिवकन्या वाघमारे शिल्पा सांगवे ,पांचाळ मावशी यांचे सहकार्य लाभले.