
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून बलिदान देणाऱ्या सदाशीव शिवाजी भुंबर यांच्या कुटूंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी शिवसंग्रामसंघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने दि. २०/११/२०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना शासकीय मदत जाहीर केलेली आहे. परंतू यामध्ये येणोरा ता. परतूर येथील शहीद सदाशीव शिवाजी भुंबर या तरुणाच्या कुटूंबाचा समावेश नाही. या तरुणाने दि. १४/०९/२०२१ रोजी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे. यांच्या कुटूंबीयांना शासकीय मदत अद्याप मिळालेली नाही. माजी सार्वजनिक मंत्री तथा मराठा उपसमिती अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनाही मागण्यांचे निवेदन यापूर्वी दिले होते. या निवेदन प्रतिलिपि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, याना दिल्या आहेत.या निवेदनावर शिवसंग्राम परतूर तालुकाध्यक्ष सचिन खरात यांची स्वाक्षरी आहे.