
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यवसायिकांची खूप मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली होती. सर्वात जास्त नुकसान हॉटेल व्यवसायिकांचे झाले होते. त्याच बरोबर हॉटेल व्यवसायिकांनी सामान्य नागरिकांना त्या कठीण काळात मदत केली. कोरोनाच्या काळात हॉटेल व्यावसायिकांवर आंदोलनामुळे दाखल करण्यात आलेले गुन्हे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून माघारी घ्यायची विनंती करणार असल्याचे आश्वासन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
हॉटेल व्यवसायिकांना एकत्र करणारी युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनची पहिली वार्षिक बैठक पुण्यात नुकतीच पार पडली. या बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन मा. महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक फत्तेचंद रांका, महेंद्र पितालिया, असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष अॅड. अजिंक्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. असोसिएशनचे सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी, माहुवा नारायण, राहुल रामनाथ, अॅड. अजिंक्य उडाने आदी मान्यवर उपस्थित होते.