
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
कोविड मुळे ताजोदीन इब्राहीम शेख यांचा मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबाला ज्यात पत्नी व तीन मुले आहेत यांना घरातील एकमेव कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने रोजच्या अडचणींचा नित्यनियमाने सामना करावा लागू लागला.याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना मिळाली. माहिती मिळताच तात्काळ “चला देऊ मदतीचा हात कोविडमुळे म्रत रुग्णाच्या जीवनात”यानुसार त्यांनी सुरू केलेल्या मनसे मदत अभियान अंतर्गत
आज या कुटुंबाला चाकूर येथे घरपोच जाऊन आकरा हजार रुपयांची मदत केली.आजपर्यंत डॉ भिकाणे यांनी कोविडमुळे मृत झालेल्या सहा कर्त्या व्यक्तींच्या निराधार कुटुंबांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची मदत करत आधार दिला आहे.[निराधार कुटुंबांना छोटीसी मदत करून आत्मसुख व स्वर्ग भेटल्याचा खराखुरा आनंद होत असतो,नेहमी इतरांच्या दुःखात सामील झाले पाहिजे.चळवळीच्या जीवनामध्ये जनतेसाठी जगण्याची व लढण्याची सवयच पडली आहे असे डॉ नरसिंह भिकाणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ]यावेळी जिल्हाउपाध्यक्ष राहुल आरदवाड,तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,पत्रकार सलीम तांबोळी, पत्रकार नवनाथ डिगोळे तालुका उपाध्यक्ष संभाजी बडगिरे,तुळशीदास माने,शाखाध्यक्ष बसवराज होणराव,नरसिंग शेवाळे आदींसह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.