
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा बस स्थानकात लोहा न.पा.
च्या वतीने ८ कचरा कुंडी बसविण्यात आल्या असुन यांचे लोकार्पण लोहा न.पा. चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छता राखा रोगराई टाळा हा संदेश देत एक कदम स्वच्छते की और स्वच्छते की और हा संदेश हा संदेश देत स्वच्छ शहर हरीत शहर हा उपक्रम लोहा न.पा. च्या वतीने लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपाध्यक्ष दत्ता वाले व सर्व सन्माननीय सदस्य ( सभागृह) व मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन उल्हास राठोड, यांच्या सहित सर्व कर्मचारी हे समन्वय साधून लोहा न च्या वतीने लोहा शहरात विविध विकास कामा सहित स्वच्छता राखण्याची सरसावले असून आज दिनांक २२जुलै रोजी लोहा शहरातील एस टी महामंडळाच्या बस स्थानकात ८ कचरा कुंडी बसविण्यात आल्यात यात सुका कचरा व ओला कचरा अशा वेगवेगळ्या ४ कचरा कुंडी बसविण्यात आल्या असुन यात नागरिकांनी सुका व ओला कचरा हा बस स्थानकात किंवा रस्त्यावर न टाकता कचरा कुंडी मध्ये टाकावे असे आवाहन मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी केले.
यावेळी लोहा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण राठोड,अंकुश पाटील कदम,जेष्ठ नागरिक गंगाधर महाबळे, पत्रकार विलास सावळे, पत्रकार शिवराज पाटील पवार, पत्रकार सुरेश महाबळे, पत्रकार विजय चन्नावार , यांच्या सह एस टी महामंडळाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.