
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- सद्या स्थितीत राज्यात सुरू असलेल्या सत्तनाट्य आणि फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्यातील नवनियुक्त नेत्यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मोखाडा,जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय बैठका घेऊन शिंदे गटाच्या फुटी नंतर उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ तिन्ही तालुक्यातील कार्यकर्ते एकवटल्याचे दिसून येत आहेत.या बैठकांना नव्याने नियुक्ती झालेले पालघर जिल्हाध्यक्ष वैभव संखे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांना असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण भविष्यात कटिबद्ध असून अधिक जोमाने काम करून पक्ष वाढीसाठी काम करूया आणि जिंकूया असे सूतोवाच त्यांनी केले तर चेतन काका यांनी प्रामाणिक पणे काम करा,एकजुटीने रहा सगळ्याची कामे आणि सगळ्यांना सहकार्य मिळेल व विधानभवनावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वच भगवा फडकावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले की आम्ही उद्घव ठाकरे यांच्या पाठीची खंबीरपणे उभे असून भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल पवार,संपर्क प्रमुख केतनकाका पाटील,सहसंपार्क प्रमुख निलेश गंधे,विक्रमगड विधानसभा संपर्क प्रमुख प्रल्लाद कदम,पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती,युवासेना सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.