
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:मुखेडचा दौरा करुन गडगामार्गे नांदेडला जात असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कोलंबीजवळ (ता. नायगाव) तीन जेसीबी व एक हायवा जप्त करण्याची कार्यवाही केली. जप्त केलेल्या या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे शासकीय कामासाठी बुधवारी मुखेड येथे गेले होते. परत येताना गडगा, मांजरम, कोलंबीमार्गे नांदेड जात असताना कोलंबी येथे तीन जेसीबी व एक हायवा त्यांना दिसून आली. ज्या ठिकाणी ही यंत्रणा उभी होती तेथून जवळच मुरुमाचे उत्खनन केल्याचे दिसून आले. त्यामुळे तीन जेसीबी व एक हायवा ज करुन कहाळा येथील टोल नाक्यावर लावण्यात आल • ढील कारवाई करण्याच्या सुचना नायगावच्या तहसीलदार देण्यात आल्या.
या घटनेचा पंचनामा तलाठी शहाणे यांनी केला असून अवैध मुरुमाचे उत्खनन करण्याच्या उद्देशाने ही वाहने तेथे उभी केली असल्याचे पंचनाम्यात नमूद करुन तीन मोठ्या जेसीबी व एक हायवा (एम एच २६ बीई ४३१२) जप्त केल्याचे नोंद घेवून तसा अहवाल तहसीलदारांना सादर केला. प्राप्त अहवालानुसार तहसीलदार गजानन शिंदे यांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बिलोली यांचेकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता या प्रकरणी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतात ? याकडे लक्ष लागले आहे.