
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड तालुक्यातील मौजे खंडगाव येथे अनधिकृत दारलुम ही संस्था २०१२ मध्ये उभारण्यात आली आहे.
या संस्थेचा हेतू काय आहे ते गेल्या १०-१२ वर्षापासून या गावातील जनता पाहत आहे. काही संशयास्पद प्रश्न:
१)या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालत आहेत याची दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा आहे.
२) याचा सोर्स काय?
३) शासनाला महसूल मिळतो का?
३)स्थानिक विद्यार्थींना या ठिकाणी प्रवेश का नाही?
४) या संस्थेत स्थानिक लोकांना रोजगार का नाहीत?
५) या ठिकाणी छुपे अंडरग्राउंड रुम चे बांधकाम का?
६) तेथील हालचाली ह्या संशयास्पद वाटत आहेत कारण रात्र झालं कि हे आत मध्ये हे कोण्यातरी मिशन मध्ये व्यस्त आहेत असे वाटते?
७) या संस्थेचे गेट हे नेहमी बंदच का व ठराविकच लोकांना आत मध्ये प्रवेश देण्यात येतो.
एकंदरीत या सर्व प्रश्नावरुन सामान्य नागरीकांत दहशतीचे वातावरण असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, पत्रकार व बांधव उपस्थित होते.