
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- श्रावण महीन्याच्या शुभ पर्वावर संत्रानगरी वरूड शहरातील मोठा भाजीबाजार परीसरात २५ ते ३१ जुलैपर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.संत्रानगरी वरूड शहरातील मोठा भाजीबाजार परीसरात संपन्न होणार असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह ज्ञानयज्ञाच्या पुर्वी २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता कलश यात्रा तर १२ वाजता दिपक खंडेलवाल व सौ.ज्योती खंडेलवाल यांचे हस्ते कलश पुजनानंतर भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.२५ ते ३१ जुलैपर्यंत कथा प्रवक्ता पं.श्री.लक्ष्मणाचार्य व्दिवेदी महाराज चित्रकुट धाम यांचे मधुर वाणीतुन रोज दुपारी २ ते ५ पर्यंत कथा वाचन करणार आहे.या दरम्यान सोमवार २५ जुलैला देवपुजा,कथा माहात्म,मंगलवार २६ जुलैला सृष्टी विस्तार–शिव सतीप्रसंग,बुधवार २७ जुलैला ध्रुव प्रल्हाद चरित्र,समुद्रमंथन,गुरुवार २८ जुलैला वामन अवतार, रामचरित्र,कृष्ण जन्म,शुक्रवार २९ जुलैला कृष्ण जन्मोत्सव,बाल लीला,गोवर्धन पुजा,कंस वध,शनिवार ३० जुलैला कृष्ण रुख्मीणी अनन्य विवाह, सुदामा चरित्र,रविवार ३१ जुलैला यदु कुल संघार,भगवान स्वधागमन,भागवत समापन,हवन पुर्णाहुती तर सोमवार ०१ ऑगष्ट रोजी महाप्रसादाचे वितरण होणार असल्याने भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुध्दा द पॉवर ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष दिपक खंडेलवाल यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे.