
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून इंदापूर तालुक्यातील निमगाव शेळगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभागप्रमुख रणजित बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त बारवकर वस्ती,काळा मळा, शेंडे मळा,कचरवाडी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे.लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत.यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे.अतिरेकी सजावट,फुगे फोडणे, मेणबत्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे.क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून निमगाव शेळगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभागप्रमुख रणजित बारवकर यांनी आपला वाढदिवस लहान मुलांसोबत साजरा केला.या वेळी उपजिल्हाप्रमुख संजय भाऊ काळे, इंदापूर तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे ,उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे, उपविभाग प्रमुख महादेव कचरे ,शाखाप्रमुख पांडुरंग सलगर, गणेश काळे, अक्षय पिसे तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.