
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाची यंत्रणा शेतशिवारात कामाला लागली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात येत असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ६७ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ९४३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
अतिवृष्टीत जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळापैकी ८० महसूल मंडळातील चालू हंगामातल्या पिकांना क्षती पोहचली आहे. या ८० महसूल मंडळापैकी ६१ महसूल मंडळात दोन वेळेस, ३२ महसूल मंडळात तीन वेळेस, १२ महसूल मंडळात चार वेळेस, तीन महसूल मंडळात पाच वेळेस तर एका महसूल मंडळात सहा वेळेस अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर ता. नऊ जुलै रोजी ३३ मंडळात, ता. दहा जुलै रोजी लात, ता. १३ जुलै रोजी ७९ मंडळात आणि ता. १४ जुली ३६
नादेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता या पूर परिस्थितीमुळे सुमारे पाच लाख ३३ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या दोन लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात एक हजार ४२९ हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे. सदर शेती पिक व शेतजमीन नुकसानीचा तालुकानिहाय तपशील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अतिवृष्टीची संभावना लक्षात घेऊन मंडळनिहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले होते. सदर पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील ४३९ तलाठी, कृषी विभागातील ६४३ कृषी सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील ८८४ ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम आहे. आज रोजी एक लाख ४७ हजार ६७ एवढ्या शेताचे ८१ हजार ९४३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिली
जिरायत, बागायत आणि फळपीक…..
जिल्ह्यातील एकुण बाधित शेतकऱ्यांची संख्या ही पाच लाख ३३ हजार ३८४ एवढी आहे. जिरायत बाधित क्षेत्र दोन लाख ९४ हजार ५८२ हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र दोन हजार ८१६ हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र ३४.१७ हेक्टर आहे. एकुण बाधित क्षेत्र हे दोन लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर एवढे आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे एक हजार ४२९ हेक्टर एवढे आहे.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कृषी विभागाचे अधिकारी हे प्रत्येक मंडळनिहाय प्रत्यक्ष भेट देऊन शेतातील नुकसानीची पाहणी करत आहेत. नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षत च्या सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना करण्य आहेत.