
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा तालुक्याचे भूमिपुत्र देऊळगाव येथील शेख युसूफ यांची औरंगाबाद जिल्हा शहर कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे प्रदेश कांग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुबंई येथे नियुक्ती पत्र देऊन पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे
शेख युसूफ हे लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांचे आजुळ कंधार तालुक्यातील कुरुळा आहे तर कंधार येथील सासुरवाडी अशी नातेगोत्यांची नाळ लोहा कंधार तालुक्याशी आहे त्यांचे वडील शेख गुलाब हे एसटी महामंडळात औरंगाबाद येथे वाहतूक निरीक्षक म्हणून गेल्या चाळीस वर्षांपूर्वी कार्यरत होते तेंव्हा पासून ते औरंगाबाद येथील एसटी कालनी येथे स्थाईक झाले शेख युसूफ यांनी विध्यार्थी दसेपासूनच एनएसयुआय कांग्रेस च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला महाविद्यालयीन जीवनात त्यांनी एनएसयुआय चे औरंगाबाद शहर सहसचिव उपाध्यक्ष नंतर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची जबाबदारी पार पाडली शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील अनेक पदे भूषविली राजीव गांधी युथ फाऊंडेशन व शिवजयंती महोत्सव समितीत ही त्यांनी मोलाचे कार्य केले होते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ही त्यांनी जनतेची सेवा केली सन 2005 ते 2008 दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले हिंदू मुस्लिम एकता गणेश मंडळाचे सरचिटणीस म्हणून काम केले रायझींग स्टार एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी चे ते अध्यक्ष आहेत कोरोना काळात पाच लक्ष गोरगरीब जनतेला धान्याचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून कांग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले या सर्व कार्याची दखल घेऊन कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी शेख युसूफ यांची औरंगाबाद जिल्हा शहर कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असून मुबंई येथे त्यांना नियुक्ती पत्र देऊन पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे
या निवडीबद्दल लोहा कंधार तालुक्यातील जतेतून अभिनंदन करण्यात येत आहे