
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 हा कायदा लागू केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी देखील करण्यात यत आहे. त्यामुळे प्रितकुल परिस्थितीत जीवन जगणा -या दिव्यांगाना त्रास देणा-या अथवा अपमानास्पद वागणूक देणा -यांवर यापुढे अँट्राँसिटीचा गुन्हा नोंद होऊन त्याकिरता दंड व सहा महिने ते पाच वर्षीपर्यंत सक्त करावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. यामुळे देशातील सर्व दिव्यांगाना दिलासा मिळाला असून याबद्दल श्री. वसंत एकनाथराव वडजे पाटिल, प्रहार दिव्यांग शासकीय कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष लोहा यांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्यांनी दिलेल्या मुलाखातीत असे म्हटले आहे की, दिव्यांगाना त्रास देणा-यास कारावासाची शिक्षा ठोठावणारा कायदा केंद्र सरकारने पारित केला आहे. त्यामधील कलम 92 अन्वये सदरच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सुरक्षेचा देखील अंतर्भाव केलेला आहे. या पुढे कोणत्याही दिव्यांगानी स्वतःला असुरक्षित समजू नये. आसे आव्हान श्री. वसंत एकनाथराव वडजे पाटिल, प्रहार दिव्यांग शासकीय कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष लोहा यांनी केले आहे.