
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
बावडा ते नरसिंहपुर तालुका इंदापूर या परिसरातील सर्व शेतकऱ्यांन साठी शेतीपूरक फायदेशीर माती परीक्षण करणे ही काळाची गरज
अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण भागामध्ये जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमा आंतर्गत नरसिंहपूर परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माती परीक्षणासाठी नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा ते करत असताना कोणती काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक त्या वेळी घेतले. वर्षानुवर्ष पीक लागवडीमुळे मातीची सुपिकता कमी होत आहे यासाठी मातीत कोणती मूलद्रव्ये कमी आहेत कोणते घटक घातक आहेत. याची माहिती माती परीक्षणाद्वारे मिळते. त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्य व खते मिसळू शकतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना केले.
या सर्व उपक्रमासाठी प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत(मृदा शास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभाग) यांनी मार्गदर्शन केले.
सेंद्रिय खत वापरामुळे माणसांना तसेच निसर्ग व सर्व प्राणिमात्र यांना कसा फायदा होतो याचे महत्त्व कृषि दूत पृथ्वीराज देशमुख,शिवम शेंडे,प्रसाद काळे, प्रसन्नजीत देशमुख ,गौरव वाघ ,शिवराज देशमुख ,शिवतेज शेंडगे, वैभव देशमुख यांनी नरसिंहपूर परिसरातील शेतकऱ्यांना पटवून दिले. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.