
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी वाडा-मनिषा भालेराव
वाडा ग्रामीण रुग्णालय परिसरात बाहेरील वाहनांचा जास्त भरणा असल्याने रुग्णांना दवाखान्यात येण्यास अत्यंत त्रास होत असून रुग्णवाहिकेला सुध्दा बाहेर पडण्यास या वाहनांचा अडथळा होत आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास येथील सुरक्षा रक्षकाने अनेक दुचाकींच्या टायरची हवा काढून कारवाई केली आहे तर सामाजिक कार्यकर्ते अनंता वणगा यांनी येथील अनधिकृत वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.