
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर
आज दिनांक 26 /7 /2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर साहेब यांची विधान भवन मुंबई येथे ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील ग्रामरोजगारसेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करणे व इतर सर्व ग्रामरोजगारसेवकांच्या प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अमोल वाकोडे राज्य अध्यक्ष एडवोकेट दिनेश हनवते, राज्य सचिव दिलीप पांचाळ, इंद्रजीत घाडगे लातूर, नंदकुमार जाधव कोल्हापूर ,विश्वास कार्वेकर कोल्हापूर ,शिवाजी चौगुले कोल्हापूर,अमोल तायडे जळगाव ,अमोल सूर्यवंशी जळगाव, सोपान ढिवर जळगाव ,बंडू शिंदे नांदेड ,शिवम शिंदे ,नांदेड सोशल मीडिया राज्य प्रमुख चंद्रकांत गजलवार व महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा, खानदेश विभागातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते. राज्यातील CT ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्याबाबत माननीय विधानसभा अध्यक्ष साहेब यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.