
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कंधार:-कंधार तालुक्यातील पेटवडज येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन तुकाराम जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात दिनांक २५/०७/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारसी नुसार सर्वानुमते तालुका कंधारच्या मुख्य मानद अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली यापूर्वी ही गजानन जाधव हे भ्रष्टाचार निर्मूलन व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात समर्पित व प्रामाणिक वृत्तीने कार्य करत होते