
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:दिनांक 02/06/2018 रोजी श्रीमती विजयालक्ष्मी अ. संजय वाघमारे वय 35 वर्षे रा. चैनपुर ता. देगलूर यांनी तक्रार दिली की, दिनांक 02/06/2018 रोजी सकाळी 7.30 वाजताचे सुमारास पती संजय वाघमारे यांचेसह चहा पिऊन घराचे अंगणात लाकडी बाजेवर बसले असता गावातील 1. मारोती झगडे, 2. दिगांबर वाघमारे, 3 दत्तु वाघमारे, 4. रमेश वाघमारे, 5. नामदेव वाघमारे, 6. गजानन वाघमारे, 7. अशोक वाघमारे, 8. सुधाकर सोनकांबळे, 9. राहुल सोनकांबळे, 10. मधुकर सोनकांबळे व 11. पद्माकर सोनकांबळे असे हातात वेळूच्या काठ्या, फावड्यांचा दांडा घेवुन आले व माझे पतीचे डोळ्याच मिरची पुड टाकुन वरील लोकांनी जुने भांडणाचे कारणावरुन त्यांचे हातातील वेळुच्या काठ्याने व फावड्याचे दांड्याने माझे पतीचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याने त्यांना उपचार कामी सरकारी दवाखाना, देगलूर त्यानंतर सरकारी दवाखाना, विष्णुपुरी, नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरने तपासणून ते मरण पावल्याचे सांगीतले तेव्हा माझे पती संजय गोविंदराव वाघमारे वय 40 वर्षे रा. चैनपुर यांना वेळचे काठ्याने व फावड्याचे दांड्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन मरणास कारणीभूत झालेल्या वरील 11 लोकांवर कारवाई करावी अशी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे देगलूर गुरनं. 210/2018 कलम 302, 120 (ब), 143, 147, 148, 149, 323 भा. द. वि. प्रमाणे दाखल मपोउपनि मनिषा पवार यांनी दाखल करून पुढील तपास तत्कालीन पोउपनि ज्ञानोबा काळे यांच्याकडे देण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी तपासाची सुत्र हालवुन गुन्ह्यातील मयतावर मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा व आरोपी शोध कामी असे वेगवेगळे टिम तयार करुन तपास अधिकारी ज्ञानोबा काळे यांनी गुन्ह्यातील 08 आरोपीचे तात्काळ मुसक्या आवळून त्याचेकडे तपास करुन गुन्ह्यातील महत्वाचे 08 साक्षीदाराचे न्यायालयात जबाब नोंदवुन तसेच उर्वरीत आरोपीस तत्कालीन सपोनि प्रल्हाद गिते यांनी अटक करुन गुन्ह्याचा उर्वरीत तपास करुन गुन्ह्यातील अटक आरोपीता विरुद्ध दोषारोप पत्रक मा. अति सत्र न्यायालय, बिलोली येथे दाखल केले. तपास कामी मदतनिस म्हणुन पोना / 507 सतिष कदम होते.
सदर गुन्ह्यातील 10 आरोपी अटक केल्यापासून न्यायालयीन कोठडीत असुन सरकार तर्फे 09 साक्षीदार तपासण्यात आले तसेच बचाव पक्षाकडून सुद्धा साक्षीदार तपासण्यात आले. तेव्हा मा. न्यायालयाचे समोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन मा. न्यायाधीश साहेबांनी दिनांक 29/07/2022 रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी मारोती पिराजी झगडे व इतर 09 सर्व रा. चैनपुर यांना कलम 302 भा. द. वि. अंतर्गत जन्मठेप शिक्षा व 25,000/- रुपयाचा दंड न भरल्यास 03 महिण्याचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकार तर्फे अति. सरकारी अभियोक्ता श्री. संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली सदर प्रकरणात श्री सोहन माछरे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे देगलूर यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार पोना / 2423 माधव पाटील यांनी कामकाज पाहीले. सदर टिमचे मा. श्री प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, श्री निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड व श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देगलूर यांनी अभिनंदन व्यक्त केले.