
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यांतील पखरुड येथिल बी.कॉम.तृतीय वर्षाची विद्यार्थीनी पुजा चव्हाणचे आयकर विभागात भारतातील सर्वात लहान चिफ इन्फॉर्मेशन सेक्युरिटी ऑफिसर (CISO) पदी निवड झाली.या अनुषंगाने तिचा सन्मान मा.नगराध्यक्ष,विकासरत्न श्री संजय नाना गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ संयोगिताताई गाढवे यांनी केला.पूजा चव्हाण या सायबर क्राईमच्या सर्वात लहान वयाच्या ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात.यावेळी ॲड.अमरसिंह ढगे,वारेवडगाव सरपंच श्री हर्षल डीसले,श्री बाळासाहेब अंधारे, सचिन गाढवे, मुशीर शेख, विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठानचे मित्रपरिवार व पदाधिकारी यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.