
दैनिक चालू वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेलचे राज्य सचिव युनूस पठाण यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरिल पुरस्कार सोहळा हा अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न झाला. दरम्यान कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता पिंपरी चिंचवड शहरात विनाशुल्क विविध जाती धर्मानुसार सुमारे १००पैक्षा अधिक अंत्यविधी करून दिले आहे. व युनूस पठाण यांनी अनेकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.दरम्यान युनूस पठाण यांना कोरोना योद्धा हा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिकांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.