
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यातील सुनेगाव भांद्रा पांगरी पेनुर हा रस्ता जिवघेणा झाला असुन या रस्त्याचे तात्काळ कायमस्वरूपी डांबरीकरण करा अन्यथा भव्य व तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे .
सुनेगाव ते पेनुर रस्ता हा जिवघेणा झाला असुन या मतदारसंघात लोकप्रतिनिधी असुन नसल्यासारखे व मतदानाच्या वेळेस माझे मतदार व माझी जणता म्हणणारे एरव्ही मतदारसंघाकडे दुर्लक्ष देणारे असुन या रस्त्याच्या कामात संबंधित गुत्तेदाराने बोगसपणा व अभियंत्यांने भ्रष्टाचार केला असुन तातडीने या दोघांची चौकशी करुन कार्यवाही करावी त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी व हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा धर्मवीर शेतकरी संघटनेसह परीसरात सुनेगाव , भाद्रा , पांगरी , शिवणी , पेनुर , अंतेश्वर , भारसावडा , चिञायवाडी , परीसरात जनतेसह मतदारसंघातील निष्क्रिय प्रतिनीधी व प्रशासनाच्या विरोधात दिनांक 5-08-2022 रोजी लोहा – पालम रोडवर परीसरात सर्व जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.