
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे विरोधकांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरलं आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्याचवेळी पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन घेणार असल्याच्या हालचाली सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तान नेमका कधी होणार याचीच राज्यातील जनतेला लागली आहे.
आता सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल. असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून सुद्धा हिरवा कंदील मिळाला असल्याचं कळतंय. ६०:४० च्या फॉर्म्युल्यानुसार खाते वाटप निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात राज्यात पावसाळी अधिवेशन घ्यायच्या हालचाली सुद्धा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या ९ ऑगस्टपासून मुंबईत विधासभेचं पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत संकेत मिळत आहेत.
त्यामुळे मुंबईत हे अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही सूत्रांनी सांगितलं आहे.