
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
लासूर स्टेशन: हर्सूल कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असताना एस कल्ब जवळ त्या आरोपीने मला उलटी होत आहे असे सांगितले. त्या आरोपीला गाडीच्या खाली उतरविले अंधाराचा फायदा घेत आरोपी बेड्यासह पसार झाला, प्रविण राऊत (रा महेबुबखेडा,ह मु वाळुज एम आय डी सी) असे पसार आरोपीचे नाव आहे त्याच्यावर गु.र. नंबर 259/2022 भा.द.वी.कलम 379,411,34 अन्वये गुन्हा दाखल आहे त्यास शिल्लेगाव पोलिसांनी गंगापूर न्यायालयात हजर केले असता एम.सी.आर झाल्याने त्यास शिल्लेगाव पोलीस हर्सूल कारागृहात पोलीस वाहनाने सोडन्यास जात असताना सदर प्रकार घडला आहे.
लासूर स्टेशन ता गंगापूर येथील आठवडी बाजारात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने शिल्लेगाव पोलीसां समोर मोठे आव्हान उभे राहीले होते, याची दखल घेत शिल्लेगाव पोलीसांनी वेश बदलून पाळत ठेवत सात आरोपी ताब्यात घेऊन आकरा मोटार सायकल जप्त केल्या दि १ सोमवार रोजी आरोपी गंगापूर न्यायलयात हजर केले असता न्यायाल्याने त्या आरोपीला औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी करायची होती पोलीस गंगापूर हुन कारागृहाकडे रवाना झाले असता एस. क्लब च्या जवळ रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आरोपी प्रविण राऊत यांने सांगितले कि मला उलटी होत आहे यामुळे पोलीसांनी गाडी थांबवली असता अंधाराचा फायदा घेत आरोपी बेड्यासह पसार झाला त्या पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नाहीं.