
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
वसई इथेन २५ प्रवासी घेऊन मसवडकडे निघालेल्या एसटी बसमधील चालकांच्या छातीत वेदना होऊ लागल्यांने हृदयविकारांच्या झटका येतात एसटी बस सुरक्षित रस्त्यांच्या कडेला उभी करुन बसच्या स्टेअरिंग वर डोके ठेवून आपले प्राण सोडल्यांची धक्कादायक घटना आज दुपारी दीडच्या सुमारांस खेडशिवापूर टोल नाक्यावर जवळ घडली. या घटनेतील मुक्त एसटी चालकाचे नाव जालिंदर पवार असे असून ते खटाव तालुक्यांतील पळशी येथील रहिवासी होते. याबाबत अधिक माहिती अशी की वसई एसटी डेपोची वसई मसवड ही बस सेवा नियमित सुरु असते वसई डेपोतच जालिंदर पवार हे चालक या पदावर २०११ पासून सेवेत होते आज सकाळी साडेदहा वाजता वसई येथून प्रवासी घेऊन ही एसटी बस पुणे सातारा मार्गे मसवडकडे निघाली असता दुपारी स्वारगेट आगरांमध्ये एसटीचे चालक, वाहक बदलले यात एसटीचा चालक जालिंदर पवार तर वाहक संतोष गवळी यांनी एसटी बसचा ताबा घेतल्यानंतर बसमधील २५ प्रवासी घेऊन ते पुणे सातारा मार्गे मार्गस्थ झाले. दुपारी दीडच्या सुमारास सदर बस खेडशिवापूर येथील टोल नाका पार करुन एसटी पुढे घेऊन जात असताना चालक पवारांच्या छातीत तीव्र वेदना जाणू लागल्यांने श्री.पवार यांनी बस रस्त्यांच्या कडेला सुरक्षित उभी करून बसच्या स्टेअरिंग वर डोके ठेवीत, आपले प्राण सोडले या घटनेमुळे एसटी मधील प्रवासी हळहळले .जालिंदर पवार रा.खटाव तालुक्यांतील पळशी गावचे रहिवासी असून पवार हे नेहमी वसई मसवड एसटी बस घेवुन नेहमी जात असतात. त्यामुळे पवार हे मसवड करांच्या परिसरांतील नागरिकांच्या चांगलेच परिचयत होते त्यांच्या जाण्यांमुळे खटावसह,मसवड परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे.