
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पूणे शहर -विशाल खुणे
पुणे (31/07/2022)
समाजात सरोत्तम नेत्रुत्व घडवण्यासाठी दिले ,” लिडरशिप स्किल अँड टीम वर्क चे धडे“…….
स्वारगेट पुणे येथे , डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारे सक्षम लीडर्स तयार व्हावेत. या करीता *दि पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट* च्या वतीने एक दिवसीय राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले . याकरीता *यश क्लासेस चे डायरेक्टर अँड ट्रेनर प्रवीण सर* यांना खास आमंत्रित करून , प्रवीण सर यांनी उपस्थितांना हसत खेळत आनंदी वातावरणात प्रशिक्षिण केले.
समाजात वावरत असतांना विविध प्रकारे सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक, खेळ क्रीडा आदी. सांघिक प्रकारात नेत्रुत्व करणारे अनेक लीडर्स प्रकर्षाने दिसून येतात. हे सर्व लीडर चांगलेच असतात. परंतु यातील प्रत्येक जन चांगला लिडर असला तरी इतरांपेक्षा तो अधिक चांगला कसा बनू शकतो. याचे धडे ट्रेनर प्रवीण सर यांनी जागतिक लेवल विचारांत घेवुन दिले.
लिडरच्या अंगी कोणते गुण आणि अवगुन असतात ते कसे ओळखावे आणि लिडरने त्यात बदल कसा करावा. लिडरची जबाबदारी काय ? टीम वर्क कसे केले पाहिजे, कसे नाही केले पाहिजे, एका वेळी एकच काम एका व्यक्तिला करता येते. याचे प्रांतेक्षीक करून दाखवले.
ट्रस्ट चे पुणे जिल्हा प्रमुख शिवाजी वाघमरे यांनी सुरुवातीस, ट्रस्टचे चेअरमन राजूभाऊ कदम हे अध्यक्षस्थानी विराजमान होते त्यांनी , ट्रेनर, ट्रस्टी आणि उपस्थिताचे शब्द सुमनाने स्वागत केले.
ट्रस्टी राजेंद्र वाघमारे यांनी ट्रस्टची भूमिका विशद करीत असताना सांगितले की , बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पिचेस खंड 20 पान नंबर 462 वरील दाखले देत असतांना , जुलै 1956 मध्ये लिडर तयार करण्यासाठी मुंबई मध्ये बाबासाहेबांनी एक कॉलेज काढले होते. *स्टडी इन एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स* या कॉलेजची गरज काय ? याबाबतचे बाबासाहेबांचे दाखले देवून , भारतात बाबासाहेबांना अपेक्षित असे ज्ञानी, सर्वगुणसंपन्न, विचारवंत, धाडसी , साहसी, जिगरबाज, ध्येयवादी, नितिवान लीडर्स तयार करण्याची भूमिका दि पिपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट ची असणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आणि राज्य भरातुन आलेल्या लीडर्सने अद्वितिय प्रशिक्षण सोहळा अनुभवला.
मी लिडर आहे, मी कसा आहे , माझ्यात कोणती उणीव आहे , त्यावर मी मात कशी करू शकेल, मी अधिक चांगला सक्षम लिडर कसा बनू शकतो हा आत्मविश्वास उपस्थित प्रत्येक लीडर्सला मिळाला. दि पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट ने उपक्रम घेवुन आपली आम्ही भारतीय म्हणून समाजाप्रति बांधिलकी जोपासली , याचे उपस्थितांनी कौतुक केले. या उपक्रमाचा सर्वदूर सुगंध पसरावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सकाळी 11 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात ट्रस्ट चे सचिव राजाराम मोरे यांनी डायरेक्टर अँड ट्रेनर यश क्लास चे प्रवीण सर यांना ट्रस्ट तर्फे शाल, स्म्रुतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला. ट्रस्ट चे चेअरमन राजूभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शाल व विशेष सन्मानपत्र देवून शुभेच्छा दिल्या. व सर्व उपस्थितांचे आभार मानले. सुमारे 80 हून अधिक राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील नेत्रुत्व करणारे मान्यवर लीडर्स ची उपस्थिती होती.
सदर वेळी ट्रस्टचे ट्रस्टी , राजूभाऊ कदम, राजाराम मोरे, राजू वाघमारे, बाबुराव बनसोडे , भंते आधिचित्तो, मुकेश सताने , चंद्रकांत काळे, बाळासाहेब ननावरे, सचिन मोरे. तर रायगड जिल्हा प्रतिनिधी जतीन मोरे आणि त्यांचे सहकारी, सोलापूर जिल्हा प्रमुख यु व्ही जानराव आणि त्यांचे सहकारी ,
पुणे शहर प्रमुख शिवाजी वाघमारे, उपाध्यक्ष राहूल बनसोडे, सचिव विशाल खुणे, कोषाध्यक्ष महादेव बनसोडे, संघटक महेश गायकवाड, विश्वास वाघमारे, कुमार साबळे , रामदास चौरे, नरहरी भोसले, आणि कार्याध्यक्ष बाबासाहेब दहिभाते. ईत्यादी मान्यवर उपस्थिती होते .