दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
दारूचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे.या दारूमुळे व्यक्ती निष्क्रिय, लाचार व गरीब बनतो. स्वतः कडे असणारे जी काही संसाधने आहेत, ती सर्व यात खर्च होतात.
उदा : जमीन, दागिने,पैसे इ .
दारू हा वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक रोग आहे. पाच-दहा रुपयांसाठी भिक मागत हातपाय पसरणारी मानसं आपण पहिलेलि असाल. या व्यक्तींना स्वतः चा आरोग्याचा,कुटुंबाचा,प्रतिष्ठेचा आणि भविष्याचा कुठलाही विचार येत नसतो . एका जनावरासारखे या व्यक्ती आपला आयुष्य घालवत असतात . दारू पिणारा एकटा दारू पीत नाही.
तो आपल्याबरोबर आणखी घेऊन जातो. लवकर सोबत मिळत नसतील तर तयार करतो. म्हणजे एखाद्या साथी सारखा हा व्यसनी दुसरे व्यसनी तयार करतात. यांचाकडे दारू पिण्यासाठी भरपूर कारण असतात. ”आज दारूसाठी काही कारण नाही” हे हि कारण यांना पुरेसा असतं.
अगोदरच कमी असलेला पैसा हे दारूवर खर्च करतात. प्रसंगी घरातील भांडी, मुलांचे पुस्तक, बायकोचे दागिने,या गोष्टी हि निर्लज्जा प्रमाणे विकतात.
मुलांचे शिक्षण निट होत नाही कि मुलीच लग्न !
संशोधनानुसार दारू पिणाऱ्या पित्याची मुल आपल्या पुढील आयुष्यात दारूचे व्यसनी बनण्याची शक्यता खूप असते. असे हे पिता-पुत्राचे व्यसनाचे दुष्ट चक्र चालू राहते. आणि गरिबी आणखी बळकट होते .
गावठी दारू बऱ्याचदा विषारी असते. ती प्यालाने अपंगत्व अथवा मृत्यू होतो. याच दारूचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. पोट फुगणे , पोटात पाणी होने, लिवर खराब होणे यासारख्या समस्या नंतर वाढतात.
याचा कुटुंबावर आणखी आर्थिक ताण पडतो. व्यसनी व्यक्ती नेहमी कर्जबाजारी असतो.
”संसार उध्वस्त करी दारू, दारूस स्पर्श नका करू .”
आपल्या प्रियजनांना व्यसनमुक्त करा .
संपर्क : – 9860913181
