पुणे प्रतिनिधी / श्री महालक्ष्मी सामाजिक प्रतिष्ठान मंदिराचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ पुजारी यांच्या प्रयत्नाने श्री प्रवीण परमार यांनी आपल्या स्वखर्चाने मातोश्री कै. बबीताई परमार स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन आज रोजी माळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी नगरसेविका सौ सुरेखाताई कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या मंगलप्रसंगी नगरसेविका सौ कोमल ताई शेंडकर, माजी व्यापारी संघटना अध्यक्ष -रवी दांडले विद्यमान अध्यक्ष -शेषराव देवासी सेक्रेटरी -रिजवान खान अजिंक्य चव्हाण, वालचंदजी ओसवाल, नागेश पुजारी राजेश पुजारी महेश भद्रावती रवी व नूतन परशुराम पुजारी ईश्वर मुदगल, नितीन कट्टीमणी,गणेश मकराळी, मदन वालकर , संतोष कामठे आणि मंदिराचे सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी उपस्थित होते पीत सुरेखा कोड यांच्या हस्ते कापण्यात आले आणि नारळ कोमलताई शेंडकर यांच्या हस्ते फोडण्यात आले आलेल्या कार्यकर्त्यांच्या सत्कार प्रवीण परमार आणि त्यांच्या पत्नीसह परमार यांनी केले.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन मंदिराचे अध्यक्ष सुरेश पुजारी यांनी केले कार्यक्रम संपल्यावर सुरेखाताई कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आलेल्या पाहुण्या मंडळीचे अध्यक्ष सुरेश पुजारी यांनी आभार मानले..
