
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर सर्कल- हनुमंत श्रीरामे
लोहा:हाडोळी जहागीर आणि परिसरात दि 4ऑगस्ट रोजी रात्री 7 ते 10 यावेळे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या पावसामुळे नदी नाल्याला पूर येऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या पुराचे पाणी शिरले असून शेतातील पीक संपूर्ण वाहून गेले आहे.शेतामध्ये नदी नाल्याचे दगड धोंडे येऊन पीक जमीन दास्त होऊन खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे व जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यातीलच एक म्हणजे कल्याण बालाजी श्रीरामे यांच्या शेतात पाहणी केली असता पूर्ण नदी त्यांच्या शेतात घुसली आहे.व त्यांच्या शेताची व पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे.पूर्ण पीक वाहून गेले आहे व शेतात दगड धोंडे येऊन पडली आहे.तसेच पुढे वाहत जाऊन पंडित रानबा श्रीरामे ,किशन रानबा श्रीरामे यांच्या शेताने वाहत जाऊन त्यांचे पण नुकसान झाले आहे.हे एकाच ठिकाणी झाले नसून परिसरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये नदी नाले व पावसामुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतकरी आता खूप मोठ्या आसमानी संकटात अडकला आहे.तरी शासनाने हाडोळी जहागीर आणि परिसरातील शेतीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावी व शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई देऊन या प्रचंड मोठ्या संकटातून निघण्यासाठी दिलासा द्यावा ही परिसरातील सर्व ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची विनंती आहे.