
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
पन्हाळा तालुक्यातील मोठी बाजारपेठ कोतोली येथील उत्तम सुतार यांचे मोबाईल दुकान व त्याला लागूनच दगडू सातपुते यांचे आशिकी फुटवेअर असे दोन दुकान आहेत ते दिनांक ०७/०७/२२ ला रात्री २:३० वा, एका अज्ञात चोरट्याने दुकान फोडले होते. दुकानातील रोख रक्कम व काही नवीन जुने मोबाईल चोरट्याने चोरले होते.असा एक लाख दहा हजार मुद्देमाल या चोरट्याने चोरी केली होती याचाच तपास पन्हाळा पोलीस सायबर पोलीस कोल्हापूर, व शाहुवाडी उपाधीक्षक रवींद्र कुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे तसेच पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, या सर्व अधिकाऱ्यांनी यामध्ये जातीनिशी लक्ष घालून मोबाईल चोरट्यावर सापळा रचून त्याला अटक केली आहे. हा चोरटा कोल्हापूरमध्ये मोबाईल विक्रीसाठी येणार आहे .अशी खबऱ्याकडून पोलिसांना माहिती होती. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व मोबाईल दुकानात अलर्ट करण्यात आले होते. व मोबाईल दुकानदाराच्या मदतीनेच या आरोपीस नाव स्नेहाकित संजय पाटील वय २३ राहणार कोतोली ,तालुका पन्हाळा ,जिल्हा कोल्हापूर राजारामपुरी दुकानाच्या समोर अंगझडती घेतल्यास घेतल्या त्याच्याजवळ कोतोली येथील दुकानातील मोबाईल हँडसेट त्याकडे सापडले कसूर चौकशी नंतर त्याच्याकडून तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत या आरोपी करणे आणखीन काही गुन्हे केले आहे याचा तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.