
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे :
तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाला शनिवारी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली
झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा… ए वतन मेरे आबाद रहे तू… हम होंगे कामयाब… अशी देशभक्तीपर गाणी पुणे मेट्रोमध्ये गात विद्यार्थ्यांनी मेट्रो मधून प्रवास पूर्ण केला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व देशप्रेमाची भावना ओसंडून वहात होती. यावेळेस न-हे येथील जाधव शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर भारत राष्ट्रभक्तीचे संस्कार व्हावे तसेच सफूरण चढावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.