
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
नुकत्याच लोहा-कंधार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी कल्याण जामगे निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदासजी चव्हाण,युवानेते नवनाथ बापू चव्हाण व युवासेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख गजानन पाटील कदम यांनी लोहा/कंधार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.त्यात युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी कल्याण जामगे निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य बापुसाहेब चव्हाण , नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण , सुजीत चव्हाण , अमोल चव्हाण , शिवशंकर काकडे , बालाजी जामगे सुनिल जामगे , श्रीकांत पा पवार दैनिक चालू वार्ताचे उपसंपादक गोविंद पा पवार प्रल्हाद जामगे , माधव जामगे , रामदास जामगे , तालुकाभरास जिल्हा भरातुन या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.