
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
नंदनवन :- कंधार तालुक्यातील नंदनवन येथील पुल व पेठवडज शिवारातील भवानी च्या माळावर रस्ता वाहुन गेला तसेच बारुळच्या माळावरील महादेवाच्या पाटी जवळील उतारावरील रस्ता वाहून गेला आहे. नंदनवन येथील पुल होत्याचा नव्हता झाला आहे. नदीच्या पुरासोबत ढगफुटीझाल्यामुळे मातीचा ढिगारा तयार झाला आहे. बारुळ कॅपच्या पाठीमागील रस्त्यावरील पुलाचे काम सहा महिन्यापासून चालू आहे. तरी आतापर्यंत तयार करण्यात आला नाही. पुलाचे काम पूर्ण करून वाहतूकीसाठी खुला करण्यात यावा तसेच पेठवडज शिवारातील भवानी च्या माळावरील उताराचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर तयार करून देण्यात यावे अशी मागणी नंदनवन ते औराळ, चिखली,हाळदा, बारुळ, कौठा, नर्सी, राहटी, वरवंट, पेठवडज, मुखेड जाणाऱ्या प्रवाशांनी मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर याचा गंभीर परिणाम होईल असा इशारा देण्यात आला आहे.