
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
भंडारा-एका महीलेवर, दिनांक ३० जुलै ते ०२ ऑगस्ट या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व भंडारा जिल्ह्यातील कान्हालमोह येथे अमानुष अत्याचार झाले आरोपी नराधमांनी तिला गंभीर जखमा करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. सध्या ही पिडीता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. माणुसकीला काळे फासणारी ही घटना दिल्लीतील “निर्भया” प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. ह्या घटनेतील पिडीतेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच ह्या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी
तसेच सदर महिलेला अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा,यासाठी आज भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चा,भंडारा यांच्या वतीने प्रदर्शन करण्यात आले.
महिला सुरक्षा हा विषय अधिक गंभीरपणे घेण्यासाठी, दोन्ही जिल्ह्यात “दामिनी” पथकाची निर्मिती सारखे उपक्रम सक्षमपणे राबवून महिला पोलिसांची गस्त वाढवावी. जेणेकरून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. असे परखड मत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. सुनील मेंढे यांनी मांडले आणि माननीय पोलिस अधीक्षक भंडारा यांना निवेदन दिले.