
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नागपूर –येथील राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारांस भूत बोधतून मुक्त करण्यांसाठी पोटच्या आई-वडिलांकडूनच ५ वर्षीय मुलीला मरेपर्यंत मारहाण करीत यांत सदर मुलगी मृत पावली या घटनेमुळे नागपूर शहर चांगलेच हादरले, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन गेले दिवसांपासून मुलगी सतत आजारी राहणे, तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबादा झाल्यांची शंका व्यक्त करीत मुलीची यातून मुक्तता करण्यांसाठी तिला एका भोंदूबाबा कडे नेण्यांत आले. यावेळी तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यांमुळे आई-वडिलांनी व तिच्या मावशीने सदर ५ वर्षीय मुलीला जबर मारहाण केली यांत तिचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपण पोलिसांच्या ताब्यांत जाऊ नये या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या आवारांत ठेवून तिथून पळ काढला. मात्र रुग्णालयांच्या आवारांत एका लहान मुलीचा मृतदेह बेवारस असल्यांची माहिती राणा प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यांत त्या गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध लावला याप्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे वय (४५) आई रंजना वय( २४ ) मुलीची मावशी प्रिया बनसोडे वय (३२) या तिघांना पोलिसांनी अटक करण्यांत आली. सदर घटनेच्या अनुषंगाने नागपूर शहरांचे पोलीस उपायुक्त डॉ. चिन्मय पंडित यांच्यासह राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा करुन आई-वडिलांसह व मुलींच्या मावशीस पोलिसांनी अटक केली.