
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर : शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था वरुड संचलित संत तुकाराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा या उपक्रमात शिंगी गावात जनजागृती व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तिरंगी झेंडे, फुगे व घोषवाक्य लिहिलेली फलके हातात घेऊन दि १३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी घरोघरी तिरंगा झेंडा फडकविण्यात यावा यासाठी नियमावली व मार्गदर्शक सूचना गावातील लोकांना जनजागृती फेरीतुन देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे, श्री सुरेश चव्हाण, श्रीमती मंगल जाधव, श्रीमती कल्पना उरणकर, श्री गजानन हरकळ, श्री गोकुळ काकडे, श्री कैलास बनकर, श्री संदीप सावंत, श्री हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.