
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना: राज्यात चांगलेच गाजलेले टीईटी शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आता नव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे नेमके कारण हे की, राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचे नाव शिक्षक घोटाळा यादीतून पुढे आले आहे. याबाबत अधिक खुलासा परीक्षा परिषद व सायबर पोलीस यांच्याद्वारे करण्यात आला आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख व उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख अशी अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे असून, अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या ७ हजार ८७४ विध्यार्थ्यांच्या यादीत या दोन्ही मुलींचे नाव असून, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ” माझी बदनामी करण्याचा कट रचला जात असून, मुलींची चूक असल्यास बिनधास्त त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर केवळ बदनामी करण्याचा जर हा कट असेल तर दोषींविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. शेवटी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. आता नव्याने उपस्थित झालेल्या या मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वाढली आहे