
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
गेल्यावर्षी पन्हाळगड जुलै महिन्यात चार दरवाजा या ठिकाणी रस्त्याला एक मोठी भेग पडून २०० ते ३०० फूट दरीत च मुख्य रस्त्यावर तयार झाली होती. गेल्याच वर्षी आठ महिने काम करून जिओ ग्रेड टेक्नॉलॉजी ने हा रस्ता तयार केला गेला आहे. यावर्षी त्याच्या शेजारीच चार दरवाजा या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवार पेठ कडे जाणाऱ्या रस्त्याकडे बुरुज ढासळू लागला आहे. चार दरवाजाची व तटबंदीचेकाही दगड कोसळत असल्याची नजरेत आल्यावर सकाळी साडेआठच्या दरम्यान पन्हाळगडावरील गाईड रजाउल्ला मुल्ला व आयाज आगा यांनी पहिल्यांदा हे पाहता क्षणी आपल्या मोबाईल मध्ये आयाज ने हे चित्रीकरण केले व पन्हाळ्यातील ग्रुप वर पाठवले. बघता बघता संपूर्ण जिल्ह्यात हे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे पन्हाळ्यावर चिंताग्रस्त भीतीचे वातावरण पसरले यामुळे पन्हाळगडावर व पायथ्याच्या गावातील जीव मुठीतधर ला आहे. पन्हाळगड एक माळीन होते हीच भीती मंगळवार पेठ, नेबापूर, येथल्या नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली आहे. शासनाने यावर उपाययोजना करून योग्य तो निर्णय घ्यावा ग्रामस्थमध्ये चर्चा चालू आहे.
लगेच काही तासात हे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ,धनंजय भोसले यांनी पाहणी केली असता सांगितले की, मुख्य रस्त्याला अद्याप तरी काही धोका नाही आहे. पण जे जुने तडबंदी बांधकाम त्याला जे लागून आहे ते ढासळण्याची शक्यता आहे. वरील संपूर्ण माहिती भारतीय पुरातत्व खात्याला दिली गेली आहे.यावेळी भारतीय पुरातत्त्वाचे अधिकारी, विजय चव्हाण, पन्हाळा तहसीलदार, रमेश शेडगे, पन्हाळा पोलीस निरीक्षक, अरविंद काळे, पोलीस कॉन्स्टेबल,विश्वास जाधवर, बाजीराव चौगुले,माजीउपनगराध्यक्ष रवींद्र घडेल, राहुल भोसले, आदी उपस्थित होते.