
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
फलटण वडले ता. येथील ( रामचंद्र आप्पाजी मोरे वय २० रा वडले ता.फलटण) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत झाली असून याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेली माहिती अशी की वडले (भीमनगर) ता. फलटण येथील रामचंद्र आप्पाची मोरे यांनी घरात कोणाला काही न सांगता रविवारी पहाटे साडेचार वाजता राहत्या घराशेजारील लिंबाच्या झाडांस नायलॉनच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. घरातील लोकांना झोपेतून उठल्यावर सकाळी सहा वाजता ही घटना निदर्शनांस आली. या घटनेची वडलेचे पोलीस पाटील सौ.स्वाती घनवट यांना कळविल्यानंतर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत कळविले त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन युवकाचा मृतदेह शवविच्छेदनांसाठी फलटण येथे दवाखान्यांत पाठविला मयताचा भाऊ लखन मोरे यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत दाखल केली.