
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
बल्हारपूर
आज बल्हारपूर शहरात श्री संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर, तहसिल कार्यालय व पोलिस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त” हर घर तिरंगा “या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी बल्लारपूर शहरात एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.तिरंगा रॅलीने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सदरहु रॅली राजा खांडक्या समाधी बल्लारपूर येथून सुरू होत ती नगर परिषद बल्लारपूर जवळ आली त्या ठिकाणी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर ती लक्षवेधक रॅली गणपती वार्ड मार्गे गांधी वार्ड येथे पोहचली. गांधी वार्ड येथे महात्मा गांधी यांचे स्मारकास पुष्पमाला अर्पित करण्यात आली. सुभाष वार्ड मार्गे जोकु नाला चौकात संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय येथे स्थापित संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज व भारत मातेच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यांत आले .अभिवादन करून शेवटी ती भव्य रॅली बल्लारपूर येथील किल्ल्यावर आली . राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली. बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ .कांचन जगताप, चंदन सिंग चंदेल(माजी कॅबिनेट मंत्री)व बल्हारपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली .
सदरहु रॅलीत बल्हारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय ,तहसिल कार्यालय पंचायत समितीचे कर्मचारीगण बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, वर्षा सुंचुवार, अरुणा राजूरकर, सखी मंच बल्लारपूरचे सदस्य, संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय बल्लारपूरचे संचालक श्रीनिवास सुंचुवार व ईतर सदस्य तसेच
श्रीराम आखाडा बल्लारपूर येथील महिला कबड्डी संघ, गुरुनानक कॉलेज बल्लारपूर येथील एनसीसी गृपचे विद्यार्थी, रास्त भाव दुकानदार संघटनाचे पदाधिकारी व सदस्य , विविध संघटनांचे अन्य पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. आजच्या रैलीत महिलांनी आपला उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला होता. रैली बघण्यासाठी आलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा असणा-या नागरिकांनी रॅलीवर पुष्पवर्षाव करीत आजची ही (महिलांची )रैली लक्षवेधक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या वेळी दिली.