
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्यातील सर्वात मोठी महारॅली काढण्यात आली.त्यामध्ये हजारो आदिवासी बांधव उत्साहाने सहभागी झाले होते,शिवाय ५४ आदिवासी बांधवांना सन्मानित करण्यात आले.यात पत्रकार जितेंद्र मोरघा यांना आदिवासी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधून विविध योजनांचा लाभ आपल्या समाजाला मिळावा म्हणून सुमारे ११ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली.यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,खादी ग्रामोद्योगचे शिशपाल सिंह,आदिवासी समाजातील नामवंत कलाकार जयवंत सोमण,यशवंत तेलम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.त्याच बरोबर आपल्या आदिवासी साहित्याची पताका परदेशात डौलाने फडकवणारे समाज रत्न रवी बुधर यांनी आपल्या वाणीतून सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.