
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तथा हास्य जत्रा फेम कलाकार प्राजक्ता माळी ही लवकरच परभणी करांच्या भेटीला येणार आहे. तुमचा विश्वास नाही बसणार, परन्तु ते खरं आहे. एका भव्य दिव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राजक्ता समस्त परभणी करांच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी नक्कीच येणार आहे.
संभाजी नगर मित्र मंडळ आयोजित माखनचोर दहीहंडी कार्यक्रमात दही हंडी घ्या औचित्यावर त्यांची उपस्थिती पण माखनचोरासारखी अचानक पणेच होणार आहे.
रविवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ठिक सहा वाजता त्यांची उपस्थिती लाभली जाणार आहे. सुमारे सतरा वर्षांची परंपरा लाभलेल्या या दही हंडी समारोहाचे अनन्यसाधारण महत्व आहे. परभणी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कार्यरत संभाजी मित्र मंडळ गेली अनेक वर्षे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आले आहे. गोर- गरीब, गरजू, कष्टकरी, सुशिक्षित तरुण-तरुणींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे मंडळ सदैव अग्रेसर राहिले आहे. विविध स्तरांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन तरुण, तडफदार व होतकरु तरुण-तरुणींना आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांची अदाकारी पेश करण्यासाठीचे दालन निर्माण करण्यावर या मंडळाचा भविष्यात मोठा संकल्प राहाणारे असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या दहि हंडीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या मराठी अभिनेत्रीला येथे पाचारण करुन परभणीकरांच्या आनंदोत्सवात मोठी रंगत भरली जाईल यात शंकाच नसावी.