
चीनची सर्वात मोठी घोषणा; डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय औषध कंपन्यांवर 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांना धक्का बसला होता. अशातच आता चीनने भारतासाठी मोठी घोषणा केली आहे.
चीनने भारतीय फार्मा कंपन्यांवर टॅरिफ न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता भारत चीनला औषधांची निर्यात करणार आहे, यासाठी भारतीय कंपन्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतीय फार्मा कंपन्यांवरील कर हटवला
चीनने भारतीय भारतीय फार्मा कंपन्यांवर 30 टक्के कर लादलेला होता, मात्र आता तो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. एकीकडे अमेरिकेने औषधांवर 100 टक्के कर लावला असताना चीनने कर रद्द करण्याचा निर्णय घेणे हे ट्रम्पविरुद्ध उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे भारतीय फार्मा उद्योग अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.
भारत, चीन व रशिया अमेरिकेच्या विरोधात एकत्र
डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेशा धोरणांच्या विरोधात भारत, चीन आणि रशिया एससीओ शिखर परिषदेत एकत्र आले होते. तेव्हापासून हे तिन्ही देश अमेरिकेला अडचणीत आणण्याच्या योजना आखत आहेत. आता चीनने या दिशेने पाऊल उचलले आहे. चीनने भारतीय औषधांवरील शुल्क रद्द केले आहे. तसेच भारत ट्रम्प यांच्या धमक्यांना न घाबरता रशियन तेल खरेदी करत आहे. तसेच रशियाही अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता युक्रेनविरुद्ध युद्ध लढत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारतीय कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन
काही दिवसांपूर्वी चीनच्या राजदूतांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेही चीनला गेले होते. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्याची शक्यता आहे. चिनी राजदूतांनी भारतीय कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के कराचाही चीनने विरोध केला आहे. चीन सातत्याने भारताबाबत मवाळ भूमिका घेत आहे. आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिता वाढू शकते.