इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. जग एका वेगळ्या संकटात आहे. तेल आणि वायुच्या पुरवठ्यात एक मोठा व्यत्यय निर्माण झाला. इराण आणि अमेरिकेकडून होर्मुज खाडीत साैदेबाजी केली जात आहे.
तेल आणि वायू ही इराणच्या अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद आहे. तीच ताकद अमेरिकेकडून रोखण्यात आली. ज्यामुळे इराणला कुठे ना कुठे आर्थिक झटका बसला आहे. इराणच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का बसवण्याकरिता अमेरिकेकडून नाकेबंदी करण्यात आली. या सगळ्यात इराणच्या खारग बेटावरून दिलासा देणारी बातमी पुढे येत आहे. इराणने तेल साठवणुकीसाठी 30 वर्षे जुने जहाज तैनात केले आहे. इराणकडून सध्याच्या परिस्थितीमधून मार्ग काढला जात आहे. इराणने एक जुने आणि बऱ्याच वर्षांपासून निष्क्रिय असलेले सुपरटँकर पुन्हा एकदा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. हे इराणकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठे पाऊस उचलल्याचे सांगितले जाते.
प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खारग बेटावरील साठवण क्षमतेवरील संभाव्य ताण कमी या निर्णयामुळे होणार आहे. टँकर ट्रॅकिंग सूत्रांनुसार, इराणने जवळपास 30 वर्षे जुना व्हीएलसीसी नाशा पुन्हा सेवेत आणले आहे. मुळात म्हणजे अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. ज्यामुळे इराण एका वेगळ्या परिस्थितीला सामोरे जात आहे.
खार्ग बेट हे इराणच्या तेल अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी 90 टक्के वाटा येथून येतो. इराणचे हे बेट फक्त तेल भरण्याचे केंद्र नाह तर तिथे लाखो बॅरलची क्षमता असलेल्या प्रचंड साठवणूक आहे. इराण निर्यात वाढवण्याच्या प्रयत्नात आपल्या साठवण टाक्यांमधून वेगाने तेल सोडत आहे. मात्र, निर्यात नाकेबंदीमुळे होत नसल्याने इराणवर संकट आहे.
अमेरिकेने अनेक वर्ष इराणच्या तेलावर बंदी घातली. मात्र, सध्याच्या युद्धात तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. यादरम्यान अमेरिकेने मोठी घोषणा करत इराण आणि रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध काही दिवसांकरिता उठवले. निर्बंध हटवल्याने इराण मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करत आहे. पण अमेरिकेने नाकेबंदीमध्ये स्थिती अधिक बिकड झाली. आता त्यामधून मार्ग इराणकडून काढला जात आहे.
