
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक तथा लोहा कंधारचे लोकप्रिय भिमाशंकर मामा कापसे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आझाद ग्रुपचा पुणे येथील पञकार भवन मध्ये दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी पदाधिकारी नियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रमचा वसा चालवणारे पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक भिमाशंकर मामा कापसे यांच्या कार्याचा गौरव व त्यांनी स्थापन केलेल्या आझाद ग्रुपचा बोलबाला लोहा / कंधार पुरताच मर्यादीत राहिला नसुन या ग्रुपची संपूर्ण महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी जाहीर केली आहे. व या ग्रुपचे जाळे संबंध महाराष्ट्रात पसरले आहे , या ग्रुपची कार्यपद्धती सामाजिक कार्य , शैक्षणिक कार्य , अन्याय , अत्याचार , क्रीडा , शिक्षण , अनेक पध्दतीने चालु असुन या ग्रुपचे ध्येय , पुढील धोरण , उद्दीष्टे यावर विशेष चर्चा आझाद ग्रुपच्या पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात उपस्थित मान्यवर मंडळीचे मार्गदर्शन लाभेल आशी माहिती आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी दिली.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दादु बुळे संशोधन अधिकारी पुणे , जयदेव म्हमाणे आंतरराष्ट्रीय खेळाडू पुणे , केतकी पटवर्धन दळवी , समन्वयक लोकमान्य टिळक लाॅ काॅलेज पुणे , प्रकाश मिरानी उद्योगजक पुणे , डि एस लोखंडे पाटील मुख्य संपादक दैनिक चालु वार्ता , क्षितीज यामिनी शाम मानव युट्यूब चॅनल समन्वयक , भिमाशंकर मामा कापसे अध्यक्ष आझाद ग्रुप , प्रमोद टाले उपाध्यक्ष आझाद ग्रुप , ज्योतीताई कापसे कोषाध्यक्ष आझाद ग्रुप , ओमकार आंधळे विनोद पा गवते , संतोष गवते उद्योगजक पुणे , सुनिल पेनुरकर उद्योगजक पुणे, पांडुरंग शेटे , मुंजेश आवाड , प्रसाद पोले शिवहार पांडागळे, सतिश पाटील बाबार व सर्व आझाद ग्रुपचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आशी माहिती आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे यांनी दिली.