
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांतील भूमिपुत्र आणि राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यापासून सातारा जिल्हा हा त्यांनी प्रथम दौरा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये गुरुवारी दिवसभर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यांवर असून जिल्हा आढावा बैठक घेवुन ते त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यांतील दरे या मूळगावी मुक्कामी होते. मुख्यमंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यापासून प्रथमच आपल्या मूळगावी ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी येत असल्यांने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यात सातारा जिल्ह्यांत गुरुवार, शुक्रवार दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता. घरांबाहेर पडणे मुश्किल असताना गेले दिवस प्रशासन मात्र मुसळधार पावसांत सर्कस करीत होते. डोंगरी आणि दुर्मिळ भाग असल्यांने या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या गैरसवींना सामोरे जावे लागत आहे.असे असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन मात्र भर पावसांत चांगलेच कामाला लागले मुसळधार पाऊस सोसाट्यांचा वारा यामुळे प्रचंड हाल झाल्यांचे पोलिसांनी यावेळी सांगितले.